मोठी बातमी : पुढच्या आठवड्यात नगरपालिका निवडणुकीचा बिगुल; फक्त २१ दिवसांत सगळं आटोपतं ?

1684

वणी | २ नोव्हेंबर २०२५ :

अखेर बातमी आली ! राज्य निवडणूक आयोग पुढच्या आठवड्यात –अंदाजे सोमवारी किंवा मंगळवारी२४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा करु शकते. आणि हो, फक्त २१ दिवसांत सगळी प्रक्रिया – नामांकन, प्रचार, मतदान, निकाल – पूर्ण होणार ! नोव्हेंबरमध्येच मतदान, दुसऱ्याच दिवशी मतमोजणी.

● निवडणुका तीन टप्प्यात :

  1. पहिला टप्पा → नगरपालिका + नगरपंचायत (नोव्हेंबर)

  2. दुसरा टप्पा → जिल्हा परिषद + पंचायत समिती (डिसेंबर)

  3. तिसरा टप्पामुंबईसह २९ महापालिका (१५-२० जानेवारी २०२६)

घोषणा होताच आचारसंहिता लागू, राजकारण्यांचे ‘उद्घाटन’ आणि ‘भूमिपूजन’ थांबणार!


● पूरग्रस्त भागामुळे क्रम बदलला :

सध्या ग्रामीण भागात अतिवृष्टी-पूरमुळे मदतकार्य जोरात. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, “जिल्हा परिषद निवडणुका लगेच शक्य नाहीत.” म्हणून नगरपालिका आधी, जिल्हा परिषद नंतर.


● सर्वोच्च न्यायालयाची डेडलाइन :

  • ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सगळ्या निवडणुका पूर्ण करायच्या.

  • म्हणून महापालिका निवडणुका १० दिवस आधी, म्हणजे २० जानेवारीपर्यंत संपणार.


● ईव्हीएमची चिंता संपली !

ईव्हीएम कमी पडणार म्हणून आयोगाने:

  • मध्य प्रदेश सरकारकडून करार

  • ५० हजार नवीन ईव्हीएम खरेदी (ECIL कडून)

  • भारत निवडणूक आयोगाकडूनही मदत मागितली

प्रभाग रचना, ओबीसी आरक्षण – सगळं तयार ! आता फक्त निवडणूकीचा घंटा वाजायचा बाकी !


www.WaniSamachar.com

■□■