● निधनवार्ता : आर्किटेक्ट शैलेश तोटेवार यांचे वडील सुभाषजी तोटेवार यांचे हृदयविकाराने निधन !

260

● निधनवार्ता ●

आर्किटेक्ट शैलेश तोटेवार यांचे वडील सुभाषजी तोटेवार यांचे हृदयविकाराने निधन !


वणी । २७ फेब्रुवारी २०२६ :

वणी येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि आर्किटेक्ट शैलेश तोटेवार यांचे वडील श्री. सुभाषजी गणपतराव तोटेवार (वय ८० वर्षे) यांचे आज, शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने तोटेवार परिवारासह वणी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुभाषजी तोटेवार हे गेल्या अनेक वर्षांपासून वणी येथील वरोरा रोडवरील पंचवटी अपार्टमेंट येथे वास्तव्यास होते. अत्यंत मनमिळावू आणि शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची समाजात ओळख होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा (आर्किटेक्ट शैलेश तोटेवार), चार मुली, नातवंडे आणि बराच मोठा आप्तस्वकीय व मित्र परिवार आहे.


WaniSamachar.com परिवारातर्फे मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली !


www.WaniSamachar.com