भाजपाचा ‘मास्टरस्ट्रोक’! आज सर्व २९ नगरसेवक + १ नगराध्यक्ष अर्ज एकाचवेळी; भव्य मोर्चा काढणार..

1181

वणी न.प. निवडणूक २०२५: भाजपाचा ‘मास्टरस्ट्रोक’! आज सर्व २९ नगरसेवक + १ नगराध्यक्ष अर्ज एकाचवेळी; भव्य मोर्चा काढणार, जनतेची प्रतीक्षा संपली! अन्य पक्षांना ‘शॉक’!


वणी | १६ नोव्हेंबर २०२५ :

वणीकर जनतेची दिर्घ प्रतीक्षा अखेर संपली! आज संत श्री जगन्नाथ महाराज यांचा १६ तारखेचे महत्त्व साधत भारतीय जनता पार्टी (भाजप) ने उमेदवारी जाहीर करण्याचे टाळ टाकले आणि थेट सर्वचासर्व १४ प्रभागांतील २९ नगरसेवक१ नगराध्यक्ष पदासाठी आज दि. १६ नोव्हेंबर,२०२५ रोजी भव्य मोर्चा स्वरूपात एकाच वेळी अर्ज दाखल करण्याचा मेगा प्लॅन आखला आहे.

१७ नोव्हेंबर ही अंतिम मुदत असताना, भाजपने आज रविवार दि. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता हा ऐतिहासिक सोहळा पार पाडण्याचे ठरवले आहे.

▪︎अन्य पक्ष व्यस्त, भाजपने मारला ‘पहिला क्रमांक’!

अन्य पक्ष अजून पक्षप्रवेश, आघाड्या आणि उमेदवार निश्चितीच्या गोंधळात असताना, भाजपाने ‘पहिल्या क्रमांकाची’ जोरदार सुरुवात केली आहे.

आम्ही मतदारांना संभ्रमात ठेवले नाही. थेट कृती करतो आहोत,” असे मा.आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले.

आम्ही पहिलेच पाऊल टाकले. जनतेला आता स्पष्ट चित्र मिळेल,” असे भाजप शहर अध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांनी सांगितले.

▪︎सकाळी १० वाजता श्री. रंगनाथ स्वामी मंदिरापासून ‘कमळ मोर्चा’

  • स्थळ: श्री. रंगनाथ स्वामी मंदिर, जत्रा मैदान रोड, वणी
  • आज रविवार दि. 16 नोव्हेंबर,२०२५.
  • वेळ: सकाळी १०:०० वाजता
  • विशेष: प्रदेश पदाधिकारी, जिल्हा नेते, माजी लोकप्रतिनिधी, मंडल पदाधिकारी, शक्तीकेंद्र-बूथ प्रमुख, युवा मोर्चा यांच्यासह हजारो कार्यकर्ते, नागरिक मोठ संख्येत उस्थित राहणार.

चला कमळ फुलवायला, चला अर्ज भरायला! अशा घोषणांसह भाजपाचा हा मेगा शो निवडणुकीला नव्या दिशेचा संकेत देणारा ठरेल, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

▪︎भाजपाचा मोर्चाचे मार्ग 

  • सकाळी १०.०० वा. श्री. रंगनाथ स्वामी मंदिर, जत्रा मैदान रोड, वणी
  • देवदर्शन व विशेष पुजेचे आयोजन
  • भव्य मोर्चामंदिर ते निवडणूक कार्यालय
  • निवडणूक कार्यालय येथे अर्ज दाखल..
  • निवडणूक कार्यालयातुन जगन्नाथ महाराज देवस्थान,  लो.टि.महाविद्यालय समोर येथे दर्शन-पुजन व समारोप.

▪︎भाजपचे जनतेला आवाहन 

भाजप कडून वणीकर जनतेस जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, आज निघणाऱ्या ‘भव्य मोर्चात’ मोठ्या संख्येत सहभागी व्हावे.

▪︎भाजपाची ‘वन-शॉट’ रणनीती

  • एकाच दिवशी सर्व (२९+१) ३० उमेदवारांचे अर्ज
  • प्रभागनिहाय सर्वे पूर्ण, उमेदवार निश्चित
  • जनसंपर्क ते अर्ज दाखल – संपूर्ण नियोजन

▪︎अन्य पक्षांना ‘धक्का’

  • आघाडीवरून वाद, उमेदवार निश्चिती रखडली.
  • आयाराम-गयाराम: अर्ज भरण्यापूर्वीच ‘पक्षबदल’चा धडाका

भाजपाच्या या ‘ऑल-इन-वन’ मोहिमेमुळे अन्य पक्षांमध्ये धावपळ उडाली आहे. “१७ नोव्हेंबरपूर्वी आम्हीही यादी जाहीर करू, पण भाजपाने टायमिंग परफेक्ट पकडला,” असे एका विरोधी नेत्याने सांगितले.


▪︎वणीकर काय म्हणतात?

  • भाजपाने दाखवले की ‘काम की बात’ कशी करायची!” – प्रभाग ५ चा मतदार
  • आता तरी स्पष्ट चित्र येईल, संभ्रम संपेल” – एक व्यापारी बांधव

आजचा दिवस ठरणार ‘टर्निंग पॉइंट’! भाजपाचा भव्य मोर्चा की अन्य पक्षांचा ‘कॅच-अप’ गेम?

लाइव्ह अपडेट्ससाठी आमचे पोर्टल/अॅप डाउनलोड करा! कमेंट करा: तुमच्या प्रभागात भाजपाचा उमेदवार कोण असेल?


www.WaniSamachar.com


■□■