शिवसेना (उबाठा) च चटणी-भाकर आंदोलन म्हणजे फक्त राजकीय नाटक – मा.आ. संजिवरेड्डी बोदकुरवार 

770

वणी समाचार : काही दिवसापुर्वी वणीत आ.संजय देरकर यांचा नेतृत्वात शेतकऱ्यांना त्यांचा शेतमालाचा योग्य भाव मिळावा व त्यांना त्वरित हेक्टरी मदत मिळावी, यासाठी चटणी-भाकर आंदोलन (👈🏻 आंदोलनाबद्दल अथीक माहीती करीता क्लिक करा ) केले होते.

आता या आंदोलनावर मा.आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांची तीव्र अशा शब्दांत प्रतिक्रिया समोर आलेली आहे.

ते म्हणाले की, “हे सगळं राजकीय नाटक आहे. या लोकांना शेतकऱ्यांची खरी चिंता नसुन फक्त येणाऱ्या ‘स्थानिक स्वराज्य संस्थांचा’ निवडणुकीसाठी ही स्टंटबाजी आहे.” महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप काही केलेलं आहे आणी ती मदत शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचत आहे व “महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे व कायम राहील,” असा मनोगत त्यांनी व्यक्त केलेला आहे.

या प्रतिक्रियेनंतर वणीचं राजकीय वातावरण तापलेल आहे. शिवसेना (उबाठा) आणि भाजपा नेते शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून समोरासमोर आलेले आहेत.

■□■