शिवसेना(उबाठा) तर्फे राज्य सरकार विरोधात वणीत अनोखे “चटणी भाकर आंदोलन”

450

वणी येथे आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात शिवसेना (उबाठा) तर्फे टिळक चौकात शेतकऱ्यांचा शेतमालाला योग्य भाव मिळावा या करीता अनोखे “चटणी भाकर आंदोलन” करत विरोध प्रदर्शन केले.

या आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी चटणी भाकर खाऊन सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध केला व सरकारच्या आश्वासनाची होळी केली.

यावेळी आमदार संजय देरकर, शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष संजय निखाडे, सुनील कातकडे, दिलीप काकडे, विनेद ढुमणे व अनेकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

त्यांनी सरकारवर आरोप केले की, शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिले जात आहेत, प्रत्यक्षात मात्र काहीही मदत मिळालेली नाही. हेक्टरी १८,५०० रुपये मदतीची घोषणा फसली असून, शेतकऱ्यांच्या खिशात काहीही पडलेले नाही.

सरकारच्या शेतीसंबंधी विधेयकाचा निषेध करत शेतकऱ्यांना त्वरित मदत आणि त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव देण्याची मागणी करण्यात आली. कापसाला १५,००० आणि सोयाबीनला १०,००० रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, अशी यावेळी ठाम मागणी करण्यात आली.

या आंदोलनात शेतकरी व शिवसेना (उबाठा) चे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

■□■

Previous articleस्व. गोवर्धन असरानीजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
Wani Samachar
वणी समाचार (Wani Samachar) ही वणी तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्व भागातील आणि चंद्रपूर सीमावर्ती परिसरातील एक विश्वसनीय व स्वतंत्र डिजिटल News Portal आहे. आमचे उद्दिष्ट स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी वाचकांपर्यंत सत्य, निष्पक्ष आणि तात्काळ पोहोचवणे आहे.