वणी :- येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी कामाला लागली असून नुकतेच शहर अध्यक्ष एड. निलेश माया महादेव चौधरी यांनी सर्व प्रभागात मतदार पर्यंत पोहचण्याकरिता प्रभाग प्रभारी आणि प्रभाग सह प्रभारी यांची नियुक्ती केली आणि दिनांक १८ ऑक्टोबर रोजी वसंत जिनिंग वणी येथे दुपारी सहविचार सभा तथा नियोजन बैठक संपन्न झाली.
🔴 यावेळी १०० महिला भगिनी आणि २५ पुरुष यांनी भारतीय जनता पार्टी मधे पक्षप्रवेश केला, मान्यवरांनी त्यांना पक्षाचा शेला देऊन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
🔴 सदर प्रसंगी माजी आमदार श्री संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी तथा माजी नगराध्यक्ष श्री तारेंद्र भाऊ बोर्डे, राज्य परिषद सदस्य तथा वरिष्ठ नेते श्री दिनकर पावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य, यवतमाळ जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष तथा वरिष्ठ नेते श्री विजय पिदुरकर, माजी पंचायत समिती सभापती आणि भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय पिंपळशेंडे, भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्री रवी बेलुरकर, भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्री कुणाल चोरडिया, भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा सचिव श्री संतोष डंभारे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष श्री श्रीकांत प्रभाकर पोटदुखे, महादेव खाडे सर, ओ बी सी मोर्चा अध्यक्ष श्री पवन राम एकरे, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष दिपक शंकरराव पाऊणकर, शहर मंडल चे सर्व पदाधिकारी व सदस्य, सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, बूथ समिती सदस्य तथा आघाडी/सेल/ प्रकोष्ठ आणि युवा मोर्चा प्रमुख, पदाधिकारी समवेत जवळपास ३५० कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी येणाऱ्या
🔴निवडणूक बाबत उपस्थित कार्यकर्ता यांना मार्गदर्शन तथा सूचना करून सर्वांना कामाला लागण्यास सांगितले.
🔴 यावेळी दिनांक १९ ऑक्टोबर ते दिनांक २३ ऑक्टोबर पर्यंत नगरसेवक तथा नगराध्यक्ष पदाकरिता इच्छुक व्यक्तींना पक्ष द्वारा उपलब्ध करून दिलेला अर्ज प्राप्त करून तो दस्तऐवज सहित दिलेल्या मुदतीत भरून देण्याच्या सूचना सुद्धा दिल्या गेल्या.
■□■